GRAMPANCHAYAT RANBOTHALI

ग्रामपंचायत रानबोथली - संकेतस्थळ लवकरच सुरू होत आहे

0

दिवस

0

तास

0

मिनिटे

0

सेकंद

रानबोथली, ग्रामपंचायत ही चंद्रपूर जिल्हा परिषद, ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामीण स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायत मध्ये मौजा रानबोथली, गायडोंगरी, काटली चक व सावरदंड चक इत्यादी महसुली गांवे समाविष्ट असून ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या 1793 आहे. रानबोथली हे गांव ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासून 125 कि.मी. अंतरावर आणि ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून 13 कि.मी. अंतरावर असलेले हे गांव प्रशासनाचे एक केंद्र आहे.

रानबोथली येथे पोस्ट ऑफिस असून पिन कोड 441206 आहे. रानबोथली या गावाच्या आसपासची चौगान, मेंडकी ही महत्वाची गांवे आहेत. रानबोथली या गावापासून ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, आरमोरी, देसाईगंज (वडसा) ही महत्वाची शहरे आहेत.

रानबोथली या गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना सुरु आहे. गायडोंगरी या गावासाठी सोलर आधारित स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना सुरु आहे. काटली चक व सावरदंड चक या गावासाठी सोलर दुहेरी पंप योजना सुरु आहे.

📧 ईमेल: gpranbothali3403@gmail.com
📞 संपर्क: 9579820749 / 9881769378